अवसरी : महाराष्ट्रशासनाने परिपत्रका द्वारे कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे असे सूचित केले होते त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात दि .१९ ते २५ नोव्हेंबर, २०२१ दरम्यान कौमी एकता सप्ताह उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यामधे सामाजिक एकतेची भावना निर्माण व्हावी हा यामागचा प्रमुख उद्देश होता. या कौमी एकता सप्ताह अंतर्गत महविद्यालयात खालील विविध उपक्रम राबविण्यात आले .
१) राष्ट्रीय एकात्मतेची शपथ: महाविद्यालयाचे प्र..प्राचार्य डॉ.डी.आर.पानगव्हाणे यांनी सर्व विभागप्रमुख अधिकारी कर्मचारी यांना खालीलप्रमाणे राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली “मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधीत राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन. मी अशीही प्रतिज्ञा करतो की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन.” कौमी एकता सप्ताह अंतर्गत विविध नामांकित व्यक्तींची विविध विषयावर खालील प्रमाणे ऑनलाईन व्याख्याने झाली व त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
२) अल्पसंख्याक कल्याण दिवस: सदरील दिवशी श्री मोआझ्झम कापडे यांनी १५ कलमी सरकारी कार्यक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
३) दुर्बल घटक दिवस: डॅा वासुदेव देऊळकर यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील कमकुवत व्यक्तींना २० कलमी सरकारी कार्यक्रमांतर्गत मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
४) सांस्कृतिक एकता दिवस: प्रा. दिलीप चौधरी यांनी भारतातील विविधतेतील एकतेवर भर देणारे व एकात्मता संबंधीची भारतीय परंपरा ठळकपणे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
५) महिला दिन: प्रा. अश्विनी तळेकर-कुलकर्णी यांनी राष्ट्र उभारणी व विकास यासंदर्भातील महिलांचे महत्व व त्यांचे योगदान, भूमिका याबाबत विद्यार्थ्यांमधे जागरूकता निर्माण व्हावी म्हणून व्याख्यान दिले .
६) पर्यावरण जोपासना दिवस: प्रा. नागप्पा काराजनगी यांनी वातावरणाचा बिधडलेला समतोल, पर्यावरणाची झालेली हानी व त्याप्रती हवी असलेली नागरिकांमधील जाणीव ठळकपणे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
कौमी एकता सप्ताह साजरा करण्यासाठी डॅा मोहम्मद शेख यांनी संयोजन केले. श्री विकास जगताप यांनी या कामी सहकार्य केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: